E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
येरवडा मनोरूग्णालच्या वसाहतीत तरूणाचा मृतदेह आढळला
Samruddhi Dhayagude
22 Mar 2025
येरवडा : प्रादेशिक मनोरूग्णालय येरवडा जुन्या वसाहतमधील एका पडक्या घरात एका आठरा वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळला आहे. या तरूणाचा खून केला असून पोलिसांनी आरोपीचा तत्काळ शोध घेऊन अटक करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
साहिल विलास कांबळे (वय १८ मुळ रा. देवरूकपूर बौध्दवाडी जि. रत्नगिरी, सध्या धानोरी पुणे) असे मृत तरूणाचे नावे आहे. साहिल शनिवार पेठ मध्ये प्रिटींग प्रेस मध्ये काम करत होता. विलास कांबळे हे शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे गट विश्रांतवाडी शाखा प्रमुख आहे. 16 मार्च ला दुपारी साहिला धमकीचे फोन येत असल्याची तक्रार विश्रांतवाडी पोलिस ठाणे हद्दीतील साप्रस पोलिस चौकीत दिली. मात्र पोलिसांनी कोणते ही पाऊल उचलले नाही. या नंतर त्याचे अपहरण झाले. तेव्हाही तक्रार दिली तरी पोलिसांनी कोणती भूमिका घेतली नाही. 17 मार्चला येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मनोरूग्णालयाच्या पडक्यात घरात दोरीने लटकाविलेला साहिलाचा मृतदेह आढळला. या दरम्यान त्याचे पायी जमीनीवरच होते. शिवाय तोंडाला माती लागलेली दिसली. ही आत्महत्या नसून याचा खून केला असल्याची माहिती विलास कांबळे यांनी येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिसांना दिली. तरी पोलिसांनी कोणती कारवाई केली नाही. येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालयातील कामगारासाठी याच परिसरात अनेक वर्षापासून येथे वसाहत आहे. मात्र काही घरांच्या भिंती खराब झाल्याने या बर्याच घरात कोणी राहत नसल्याने येथे गुंड मुले, तसेच काही गुन्हेगार व अल्पवयीन मुले गांजा व मद्य पित असतात. कोयते, धारदार शास्त्र घेऊन दशहत माजवितात. स्थानिक नागरिक भीतीमुळे कुठे ही तक्रार करत नाही. शिवाय येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे हा परिसरच गुन्हेगाराचा अड्डा बनला आहे. दिवस ढवळ्या अहरण करून धमक्या येतात अशी तक्रार देऊन ही पोलिस गप्प बसत आहेत. या खुनातील आरोपींना तत्काळ अटक करावी, अन्यथा पोलिस आयुक्ता कार्यालय समोरच आंदोलन करणार, असा नातेवाईकांनी इशारा दिला आहे.
धमक्याचे फोन येत असल्याचे पोलिसांना सांगून ही कोणातच तपास केला नाही. धानोरी, विश्रांतवाडी-येरवडा परिसरात मोेठी गुन्हेगार टोळ्या सक्रीय आहेत. याच्यावर पोलिसांनी कारवाई करून गुन्हेगारांना पकडून खाक्या दाखविला पाहिजे. तरूण पिढी व्यसनी होत चालली आहे. सर्वत्र अमली पदार्थ आणि गांजाची विक्री होत आहे. हे पोलिसांना माहिती असून कोणती ही कारवाई केली जात नाही. ही खंत आहे. मात्र खुनातील आरोपींना तत्काळ अटक करावी.
- विलास कांबळे, साहिलचे वडील
सध्या विश्रांतवाडी पोलिसांना मध्ये गांर्भीय दिसत नाही. नागरिकांच्या अडचणीला येत नाही. फक्त कागदी घोडे चालवून लोकांची दिशाभूल करत आहे. तक्रार दिल्यावर तत्काळ तपास सुरू केला असता तर साहिलाचा जीव वाचला असता. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांची ही चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच येरवडा पोलिसांनी तत्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करावा. अन्यथा रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आंदोलन करणार
- विशाल साळवे, (अध्यक्ष वडगावशेरी, रिपब्लिकन पक्ष आठवले गट )
प्रेसच्या जागेत जुन्या पडलेल्या बंगल्यामध्ये एका मुलांनी गळाफास घेतल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून समजली. तत्काळ घटनेस्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला.त्यानंतर येरवडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह ससून रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.साहिल कांबळे या मुलानी गळफास घेऊन मयत झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. असे येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी म्हटले आहे.
Related
Articles
पंतप्रधान मोदी ५ एप्रिलला श्रीलंका दौर्यावर
23 Mar 2025
महापालिकेला ’राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता मोहिमे’चे द्वितीय बक्षिस
27 Mar 2025
आठ कोटींचे अमली पदार्थ नष्ट
26 Mar 2025
शाहरुखसोबत विराटच्या भन्नाट नृत्याला करोडो चाहत्यांची पसंती
24 Mar 2025
सोलापुरातील उद्याने आणखी चार दिवसांनी उघडणार
26 Mar 2025
अमेरिकेत शिकणार्या भारतीय विद्यार्थ्यांवर टांगती तलवार
28 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
युपीआय व्यवहारावर कर?
2
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
3
राजीनाम्याने प्रश्न संपलेला नाही
4
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
5
जमिनी खालचे प्रदूषित पाणी एक गंभीर जागतिक समस्या
6
औटघटकेचे पंतप्रधान?